Wednesday, March 2, 2011

The Lady factor in my life...(3)

My most favorite teacher : मानसी देशपांडे/कुलकर्णी 

ह्या व्यक्तिबद्दल लिहिणे कित्ती कठिण आहे, हे मला अत्ता समजले. आणि म्हणुनच ह्या series चा तिसरा, शेवटचा आणि पहिल्या दोन topics इतकाच महत्वाचा topic लिहायला मला इतका वेळ लागला आहे. मानसीmam मला ईंन्जिनिरींगच्या पहिल्या वर्षाच्या दुसय्रा semisterla C++ हा विषय शिकवायला होत्या (कित्ती complicated  आहे(त) बघा..!!). मला आजही त्यांचे पहिले लेक्चर आठवतेय.

 9 वाजताच्या लेक्चरसाठी त्या आल्या होत्या, मी 8 वाजताचे लेक्चर सवयी प्रमाणे बुडवुन 9 च्या लेक्चरसाठी classच्या बहेर् उभा होतो. थोड्या nurvous , थोड्या टेंशनमध्ये असलेल्या mam मी पहिल्या. परंतु, त्या दिवशीच्या पहिल्या लेक्चर पासुन् ,ते शेवटच्या लेक्चर पर्यंत त्यांच्यात झालेली improvement  मला वाटतं, मला सगळ्यात जास्त भावली.

C++ शिकविण्यात त्या ऊत्तमचं होत्या, पण त्यांच्याविषयीचे हे पोस्ट लिहिण्याचे कारण, C++ ह्या विषया व्यतिरीक्त जे मला त्यांच्या  personality मधुन शिकयला मिळाले ते आहे. Semister संपल्यावर, खरं तर, तसा आमचा काही touch मधे राहण्याचा प्रश्न नव्हता. त्या computer science dept.la आणि मी Telecom dept. ला होतो. पण तरीही मी त्यांच्या touch मधे राहीलोच. मानसी mam  नी आमच्याच college मधून Engineering  करुन मग Teachingला सुरुवात केली होती. त्यांच्या  लेक्चरला बसणे म्हणजे काही गोष्टी मी expect करुनच बसायचो. एखादा कठिण प्रश्न तर् मला ठरलेलाच असायचा. मला आठवते, रात्री 12-1 वाजता, drawingच्या sheets झाल्या की मी C++ वाचायचो, का तर उद्या mamचे लेक्चर आहे आणि मी ठरलेला बकरा आहे. (केव्हढी दहशत!!).नंतर नंतर तर मी धडा वाचुन जायचो पण उगाच चुकीची उत्तरं द्यायचो..... मग mamची ठरलेली आरती. (:-D,:-D,:-D)

Semester झाल्या नंतर आमचे बोलणे शक्यतो Teacher/Student न होता, Senior/Junior level चे व्हायचे. त्या मला शिकवायला नव्ह्त्या , त्या मुळे मी बिनधास्त... पण त्यामुळे त्यांनी मला टोमणे मारायची एखादी संधी सोडली असेल...अस जर तुम्हाला वटेल तर्. .....(.तुम्ही काय ते समजून घ्या.)

Jokes apart,त्यांच्या व्यक्तिमत्वातून शिकण्यासारख्या बय्राच गोष्टिंपैकी काही निवडक सांगतो. त्यांच्याकडुन शिकण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची एनर्जी. त्या कॉलेजपासुन इतक्या दुर रहायच्या आणि त्यात ट्रेनचा प्रवास, पण म्हणुन कधी मी त्यांना थकलेले पहिले नाही, सकाळी ९ चे लेक्चर असो की सायंकाळी ४:३० चे, तितकाच उत्साह, तेच डेडिकेशन.. (तितकेच प्रश्न आणि तितकेच टोमणे ....) त्यांची शिकविण्याची एक स्वतःची शैली होती, आणि बहुतेक तशीच एक शैली त्यांच्या व्यक्तिमत्वामधे होती. त्यांच्या वागण्यात एकप्रकारचा dominance होता. त्यांच्या हावभावातुन नेहमी positive attitude दिसायचा. आपण जो विषय शिकवतो आहे त्याची accountability आणि responsibility जाणुन शिकवण्याचा नेह्मेीच त्यांचा प्रयत्न असायचा.


मला मिळालेल्या बय्राचश्या यशात आणि अपयशात त्यांचा  emotional backup नेहमिच राहिला आहे. माझा TCS मधला JOB असो किंवा Engineering मधे मिळालेली K.T.  असो,  माझा यथोचित सत्कार(त्यांच्या "खास" शैलीत!!!) आणि कौतुक नेहमिच केले गेले आहे. बय्राच वेळी महत्वाचे सल्ले आणि मार्गदर्शन मिळाले आहे, जे उपकार कदाचित सात जन्मात फेडता येणार नाहीत. कधी कधी ६-७ महिने त्यांच्याशी बोलणे होत नाही, परंतु जेव्हा होते, तेव्हा अगदि काल परवाच बोलुन झाले आहे अशी सुरुवात होते आणि म्हणुनच त्यांचा एक "मानसी"-क आधार माझ्या मनाला आहे.मागे एकदा वाचनात एक कविता आली आणि प्रार्कशाने त्यांची आठवण आली..

    अडगळीच्या खोलीमधलं
    दप्तर आजही जेव्हा दिसतं |
    मन पुन्हा तरूण होऊन
    बाकांवरती जाऊन बसतं ||

    प्रार्थनेचा शब्द अन शब्द
    माझ्या कानामध्ये घुमतो |
    गोल करून डबा खायला
    मग आठवणींचा मेळा जमतो ||
   
   या सगळ्यात लाल खुणांनी
    गच्च भरलेली माझी वही |
    अपूर्णचा शेरा आणि
    बाई तुमची शिल्लक सही ||

    रोजच्या अगदी त्याच चुका
    आणि हातांवरले व्रण |
    वहीत घट्ट मिटून घेतलेत
    आयुष्यातले कोवळे क्षण ||

    पण या सगळ्या शिदोरीवरंच
    बाई आता रोज जगतो |
    चुकलोच कधी तर तुमच्यासारखं
    स्वतःलाच रागवून बघतो ||

    इवल्याश्या या रोपट्याची
    तुम्ही इतकी वाढ केली आहे |
    हमखास हातचा चुकण्याची सुद्धा
    सवय आता गेली आहे ||

    चांगलं अक्षर आल्याशिवाय
    माझा हात लिहू देत नाही |
    एका ओळीत सातवा शब्द
    आता ठरवून सुद्धा येत नाही ||

    दोन बोटं संस्कारांचा
    समास तेवढा सोडतो आहे |
    फळ्यावरच्या सुविचारासारखी
    रोज माणसं जोडतो आहे ||

    योग्य तिथे रेघ मारून
    प्रत्येक मर्यादा ठरवलेली |
    हळव्या क्षणांची काही पानं
    ठळक अक्षरात गिरवलेली ||

    तारखेसह पूर्ण आहे वही |
    फक्त एकदा पाहून जा |
    दहा पैकी दहा मार्क
    आणि सही तेवढी देऊन जा || 

आजपर्यंत बय्राचदा माझ्याकडुन त्यांचा नकळत अपमान झाला असेल, कदाचित मी मारलेले टोमणे .. अजाणतेपणि मर्यादा ओलांडुन गेले असतिल.... काय माहित.!!!
कधि भेटल्या तर एक गोष्ट सांगायची आहे .." ...  मी तुमचा खुप आदर करतो, आणि मी आपला आयुष्यभर ऋणी राहिण ".......... आणि  I just hope की त्यांना समजेल ही मस्करी नाही...!!