Tuesday, August 3, 2010

आ(सा)ठवणितले मित्र .... आणि मित्रान्च्या आठवणि (1)

आठवणितले मित्र .... आणि मित्रान्च्या आठवणि
(Friendship Day Special ... Few words about those people for whom I have been celebrating Friendship Day on everyday ever since I met them...)


नावः विजय सुरेश वाघ. (in the center of the below photo)
भेटः इयत्ता दहावी , कोचिन्ग् क्लास

       विजय म्हणजे वर्गातला एकदम हिरो मुलगा.  आणि त्यावेळी आम्ही म्हणजे अगदिच " सर्वसाधारण".. त्यामुळे अगदी पहिल्यापासुनच जरा दोन हात लाम्ब बसायचो. मला चान्गल आठवतय आम्ही दहवीला असताना क्रिकेट खेळायला गेलो होतो आणि विजयने माझ्यासकट सगळ्यान्ची धुलाई केली होती. मला वाटते त्या दिवसा पासुन् आमचि जी मैत्री झाली ती आज पर्यन्त टिकुण आहे.इतक्या वर्षात असे बरेच प्रसन्ग आले जेव्हा मला विजय एक मित्र म्हणुन कित्ती मोठा आहे ह्याचा प्रत्यय आला..
11 वी 12 वी असो, ते सोमैयाच्या ग्राउन्ड्वरचे क्रिकेट् असो, त्याच्या घरी पहिल्यान्दाच गेलो होतो तो दिवस, 12वीला असताना आमचे झालेले भान्डन (पहिले भान्डन), मला त्रिवेन्द्रमला जाताना सोडयला आला होता तेव्हा.. असे एक न अनेक कित्ती तरी प्रसन्ग आत्ता डोळ्यासमोर उभे राहतात.आज जवळ जवळ 10 वर्ष मी त्याला ओळखतो आहे, पण तरीही मी त्याला 100% ओळखतो अस्से म्हणू शकणार नाही.त्याच्या बद्दलचा एक प्रसन्ग जो माझ्या मनावर कोरुन गेला तो सान्गतो....
मी नुकताच बाइक चालवायला शिकत होतो. एक दिवस विजयच्या घरुन येताना, विजय मला त्याच्या बाइक वरुन सोडायला आला होता. तो त्याच्या बाइक वर नी मी माझ्या.. अर्धा रस्ता गेल्यावर मी त्याला म्हटले की तु जा आत्ता, इथुन पुढे मी जाईन.तो ही म्हणाला ठिक आहे, आणि मी माझी बाइक पुढे चालवू लागलो.. मनात धाकधुक चालुच होती, पहिल्यान्दाच रोडवरुन एक्टा बाइक चालवत होतो आणि जेव्हा घराच्या अगदी जवळ आलो तेव्हा कळले, विजय् मागुन येतच होता, मी व्यवस्थित जातो की नाही, सुरक्शित घरी पोहोचतो क नाही ह्या काळजी ने...
असे कित्तीतरी प्रसन्ग..!! मोजायला लागलो  तर कदाचित ही जागा आणि सन्ख्या कमी पडतील. मी नेहमिच स्वतला भग्यवान् समजत् आलो आहे आणि विजय हे त्यामगील एक मोठ्ठ कारण आहे. आज मागे वळुन पहतो तेव्हा आठवतात ते दिवस जेव्हा मी विजय मन्दार कडे भेटायचो, परिक्शा सम्पलेल्या असायच्या, आम्ही दिवसभर उनाडक्या करत मन्दारच्या घरी पडलेले असायचो. काय बोलायचो कित्ती बोलायचो.. विषयाला कधीच मर्यादा नव्हत्या, वेळेला कसलेच बन्धन नव्हते..
मागे विजय 2 वर्षासाठी मुम्बई बाहेर होता. तो मुम्बईला यायचा तेव्हा धावत भेटायला जायचो..त्यालाही बाहेर रहाणे आवडत नव्हते पण मला वाटते माणुस एकदा नोकरीला लागला की मग ह्या सगळ्या गोष्टी अपरिहार्य होतात...तो परत जाणार असायचा तो दिवस तर अगदी नकोसा व्हायचा.. एकदा मी कामात असताना माझा फोन वाजला... ऐकुण येवढा आनन्द् झाला... असे वाटले परत एकदा मुम्बईच्या हवेमध्ये एक वेगळाच जोश आलाय... परत एकदा मन्दारच्या बिल्डिन्ग मधले क्रिकेटचे स्टम्प वाजू लागले आहेत.... तो परत येतोय.....विजय सुरेश वाघ!!!भाग -2
(सुरुवात करुन ठेवतो...)
नावः मन्दार मधुकर नाखवा. ( Blue Shirt..in above photo)
भेटः अकरावी कॉलेजचा पहिला दिवस,बेन्चवरचा शेजारचा विद्यार्थि......

No comments:

Post a Comment