Saturday, August 14, 2010

आ(सा)ठवणितले मित्र .. आणि मित्रांच्या आठवणि(2)

नावः मंदार मधुकर नाखवा.
भेटः अकरावी कॉलेजचा पहिला दिवस,बेन्चवरचा शेजारचा विद्यार्थि......

मी आईला नेहमी म्हणतो, की जर मी कॉलेजच्या पहिल्या दिवशी मंदारच्या शेजारी बसलो नसतो तर कदाचित आज माझे आयुष्य फार  वेगळे असते. मला वाटते मंदारच्या मैत्रिचे माझ्या आयुष्यातले स्थान ह्या एका वाक्यावरुन कळू शकते.मंदारसारखा साधा, सरळ आणि सभ्य मुलगा दुसरा असूच शकनार नाही अस्से मत मंदारच्याच नाही तर माझ्या, विजयच्या आणि इतर बय्राच मित्रांच्या आई बाबांचे आहे. गेली 7-8 वर्षं मी मंदारला ओळखतो आहे आणि आजही मंदार अगदी पहिल्या दिवशी भेटला होता तसाच आहे. अजुनही त्याने त्याच्यातला प्रामाणिकपणा तसाच जपला आहे हे विशेष.

11-12वी ला असताना मी आणि विजय मंदारची बरीच टिंगल करायचो, आजही करतो.. पण आजपर्यंत इतक्या वर्षात मी मंदारला फक्त दोनवेळाच रागावताना पाहिले आहे,आणि महत्व्हाचे म्हणजे दोन्हीवेळी रागावण्याचे कारण आम्ही केलेली टिंगल नाही तर वेगळेच आहे.खरे सांगायचे तर मंदारसारखा मित्र मिळणे हेच एक मोठे भाग्य आहे...आणि मंदारला हे महित असुन सुध्हा त्याचे साधे सरळ वागणे, त्याच्या मैत्रिला एका वेगळ्याच उंचीवर न्हेऊण ठेवते. जगात जी काही परिमाणं असतील, जे काही RULES असतील, मला वाटते मंदारने त्याही पलिकडे जाऊन स्वताःचे असे वेगळे स्थान पक्के केले आहे.


मंदारच्या साधेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न बय्राच लोकांनी केला पण त्या वेळी विजयने त्याला सांभाळुन घेतले आहे आणि म्हणुनच आमच्या तिघान्च्या मैत्रिमध्ये त्या दोघान्च्या मैत्रिला एक वेगळिच धार आहे. मंदारच्या कौशल्यांबद्द्ल बोलावे तेवढे कमी आहे.Badminton  खेळण्यासाठी त्याने हाताने बनवलेली  Net "अप्रतिम" म्हणावी अशीच आहे.छोठ्या छोठ्या गोष्ठींमध्ये सुध्धा जीव ओतणे जर कोणि शिकावे तर ते फ़क्त मंदारकडुनच!! मंदारच्या मैत्रिचे प्रसंग आत्ता इथे लिहित नाही, कारण येवढेच की कोणता प्रसंग निवडावा ह्यापेक्षा कोणता निवडू नये आणि का निवडू नये हे प्रश्न माझ्यासमोर आहेत.

Friends Forever...
लिहायला बसलो आणि इतक्या आठवणि डोळ्यासमोर आल्या की डोळ्यात पाणि कधी आले कळलेच नाही. एक SMS Mobile वर आला आणि मंदारचीच आठवण झाली,
मैत्री आपली मनात जपली,
कधी सावलीत... कधी उन्हात तापली,
कधी फुलात...कधी काट्यात रुतली,
तरीही मी मनात जपली...."मैत्री" आपली!!

मम्मी, " जर मी कॉलेजच्या पहिल्याच दिवशी मंदारच्या शेजारी बसलो नसतो, तर कदाचित आज माझे आयुष्य फार...... फार वेगळे असते...!!!"
******

4 comments:

  1. Nikhil..Too good.. These 2 posts just reiterate how much you value Friendship.. I would say Mandar and Vijay are more luckier to have u as their friend just as I am..:-)
    Keep writing.. U just pour ur heart and soul in each and every word..Superb I must say..

    ReplyDelete
  2. Niks, tuza blog vachatana ase vatate ki me ekhade marathi novel vachate ahe...seriously. U r just getting better and better at it. donhi posts atishay surekh zale aahet but most imp is u wrote them from ur heart which reflects in every word...asach lihit raha

    ReplyDelete
  3. hi,buddy its really nice to read something like this for friends.Your style of writing is really very touching.The whole incidence comes before eyes after reading...keep writing,best of luck............Sonal

    ReplyDelete
  4. Hiya Nik, ..i loved what u wrote..very rare to see such friends in todays world..most importantly I am getting to see a different you through your blog..n i am really proud of you..hope u continue writing ..M.M

    ReplyDelete